धुळे; शिरुड गावात दोन गटात तुफान हाणामारी; महिलेवर केला चाकू हल्ला…
मागील भांडणाचा राग डोक्यात ठेवून गावातील काही गावगुंडांनी भैय्या खैरनार यांना तुम्ही दाखल केलेली केस मागे घ्या नाहीतर तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत त्यांच्या घरावर हल्ला करीत भैय्या खैरनार याच्या आईवर चाकू हल्ला केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास शिरुड गावात घडली… या घटनेत लक्ष्मीबाई खैरनार गंभीर जखमी झाल्या असून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे….
धुळे तालुक्यातील शिरूर गावात पुन्हा दोन गटात वाद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे… मागील भांडणाची केलेली केस मागे घेण्यासाठी गावातील भैय्या खैरनार यांच्यावर दबाव टाकत काल रात्रीच्या सुमारास भैय्या खैरनार यांच्या घरावर गावातील गोलू मराठे, शुभम शिंदे, हर्षल पाटील, गोरख मराठे यांनी अचानक हल्ला करीत गावातील चार ते पाच जणांसह भैय्या खैरनार यांच्या आई लक्ष्मीबाई खैरनार यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णाला दाखल करण्यात आले आहे….
प्रतिनिधी: नागिंद मोरे