Author: Team Dhule News 24

Dhule News; दिवसा घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास! धुळे पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; मध्य प्रदेशातील दोघे अटकेत धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे धुळ्यात दिवसाढवळ्या घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा धुळे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील मध्य प्रदेशातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ६९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे घरफोडी करणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. धुळे शहरातील राधेश्याम अपार्टमेंटमध्ये घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड…

Read More

पिंपळनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! सलग दुसऱ्या दिवशी दोन बंद घरे फोडली; रोकड अन् पितळी भांडी लंपास पिंपळनेर, धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, स्वामी समर्थ नगरात सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी दोन बंद घरांना लक्ष्य केले आहे. या घटनांमध्ये सुमारे ५० हजार रुपयांची रोकड आणि पितळी भांड्यांसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी समर्थ नगरातील नरेंद्र मुरलीधर भामरे हे वैद्यकीय उपचारासाठी नाशिक येथे गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले.…

Read More

धुळे : पिंपळनेरमध्ये घरफोडीचा पर्दाफाश; 5.88 लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोकड हस्तगत भरदिवसा झालेल्या चोरीचा पोलिसांकडून उलगडा; विधिसंघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले पिंपळनेर, धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिसांनी भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करत तब्बल 5 लाख 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पिंपळनेर येथील साईबाबा कॉलनी परिसरात राहणाऱ्या माधुरी जाधव यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

धुळे: सावळदे तापी नदीपात्रात प्रेमी युगुलाचे मृतदेह; पायांना साखळी अन् कुलूप धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे धुळे जिल्ह्यातील सावळदे येथील तापी नदीपात्रात आढळलेल्या तरुण-तरुणीच्या मृतदेहांची ओळख पटली असून, श्याम हरी पाटील आणि सपना पाटील अशी मृतांची नावे आहेत. दोघेही अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी होते. या घटनेत दोघांचेही पाय लोखंडी साखळीने बांधून त्याला कुलूप लावल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या पंचनाम्यात समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर सावळदे येथील तापी नदीपात्रात त्यांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांच्या पायांना साखळी बांधून कुलूप लावण्यात आल्याचे समोर आल्याने या घटनेचे गूढ अधिकच वाढले आहे.…

Read More

धुळ्याच्या SRPF जवानाचा गडचिरोलीत सर्पदंशाने मृत्यू; अंघोळ करताना विषारी सापाचा दंश धुळे | प्रतिनिधी : नक्षलविरोधी मोहिमेसाठी गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेल्या धुळे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली. राहुल प्रभाकर शिनगारे (वय 37) असे मृत जवानाचे नाव असून, ते धुळे येथील SRPF गट क्रमांक 6 मध्ये कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानासाठी SRPFच्या विविध तुकड्या तैनात केल्या जातात. धुळे येथील SRPF गट क्रमांक 6 मधील ‘एफ’ कंपनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी गडचिरोलीत दाखल झाली होती. या तुकडीतील पोलीस नाईक राहुल शिनगारे यांची रेगडी परिसरात बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात…

Read More

धुळे; घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका; 12 गुन्ह्यांची उकल, 120 ग्रॅमपेक्षा जास्त सोनं जप्त धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे धुळे तालुका परिसरात वाढलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांना अखेर लगाम लावण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि धुळे तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सराईत चोरट्यासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल 12 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, आरोपींकडून 120 ग्रॅमपेक्षा जास्त सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील नेर येथील सेवानिवृत्त सुभेदार मेजर अनिल सूर्यवंशी यांच्या बंद घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातून पिस्तूल, दोन मॅगझीन, दहा जिवंत राउंड, रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी लंपास केली…

Read More

धुळे : विवाहित महिलेचे फोटो काढले, व्हिडिओ बनवला अन् ब्लॅकमेल केल्याचा आरोप; तिघांविरुद्ध गुन्हा रामदेव बाबा नगर परिसरातील घटना; बलात्कार, धमकी, ब्लॅकमेलिंगसह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील रामदेव बाबा नगर परिसरात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध बलात्कार, धमकी, ब्लॅकमेलिंगसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, प्रकृती बिघडल्याने ती रस्त्याने जात असताना तिने एका अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागितली होती. त्यानंतर परिसरातील काही व्यक्तींनी तिचे त्या व्यक्तीसोबतचे फोटो काढल्याचा आरोप आहे. “हे…

Read More

धुळ्यात पशुखाद्याच्या आड विदेशी दारूची तस्करी; एलसीबीची मोठी कारवाई, 20.50 लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे मुंबई-आग्रा महामार्गावर तस्करीचा पर्दाफाश; कंटेनरमधून 10.32 लाखांची विदेशी दारू जप्त धुळ्यात पशुखाद्याच्या गोण्यांआड विदेशी दारूची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान चौफुली परिसरात धुळे एलसीबीने कारवाई करत संशयित कंटेनर पकडला. पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता पशुखाद्याच्या गोण्यांआड लपवून ठेवलेला 10 लाख 320 रुपयांचा विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी दारूसाठ्यासह कंटेनर आणि पशुखाद्य असा एकूण 20 लाख 50 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरवर धुळे एलसीबीच्या पथकाने पाळत ठेवली होती.…

Read More

शिंदखेडा: तहसील कार्यालयातून जप्त ट्रॅक्टरची भरदिवसा चोरी; मालक-चालकच निघाले चोर… शिंदखेडा, धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात महसूल विभागाने जप्त करून ठेवलेला वाळूने भरलेला ट्रॅक्टर चोरीला गेल्याच्या घटनेचा अखेर उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाने ज्या ट्रॅक्टरवर कारवाई केली होती, त्याच ट्रॅक्टरचा मालक आणि चालकच चोरीच्या प्रकरणात आरोपी निघाले आहेत. शिंदखेडा तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करताना आढळून आलेला वाळूने भरलेला ट्रॅक्टर महसुली कारवाईसाठी शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करून ठेवण्यात आला होता. मात्र, दोन इसमांनी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून हा जप्त केलेला ट्रॅक्टर भरदिवसा चोरून नेला. या प्रकरणी मंडळ अधिकारी मोहन पाटील यांच्या…

Read More

धुळे हादरले! गरताडबारीनंतर देवभाने शिवारातही महिलेचा मृतदेह; सोनगीर पोलिसांकडून तपास धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे धुळे शहराजवळील गरताडबारी परिसरात काही दिवसांपूर्वी महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच, आता देवभाने शिवारात पुन्हा एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने शिवारातील एका शेतात सुमारे 45 ते 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून, घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.…

Read More