Author: Team Dhule News 24

धुळे हादरले! गर्भवतीला पेट्रोल टाकून जाळले; गरताडबारीतील क्रूर हत्याकांडाचा उलगडा धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे धुळ्यात गर्भवती महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आलेल्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. तब्बल 275 किलोमीटर दूर जामखेडहून महिलेचा मृतदेह धुळ्यात आणून पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे. तब्बल 11 तासांच्या सीसीटीव्ही तपासातून MH-43/AR-4070 या कारचा माग काढत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताडबारीजवळ गर्भवती महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आल्यानंतर मोहाडी…

Read More

धुळे; शेतकऱ्यांच्या बांधावर राष्ट्रवादीचे नेते; समस्या जाणून घेत शासनाकडे प्रश्न मांडण्याची ग्वाही धुळे | प्रतिनिधी : धुळे तालुक्यातील सोनेवाडी, शिरपूर तालुक्यातील करवंद, कान्हेरीपाडा, आनंदपाडा तसेच शिंदखेडा तालुक्यातील जोगशेलू, सोनेवाडी आणि विरदेल येथे दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांशी संवाद साधून परिसरातील पावसाचे प्रमाण, पावसातील खंड, पिकांची वाढ तसेच संभाव्य नुकसान याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि विविध समस्या जाणून घेतल्या. दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून…

Read More

धुळ्यात बसमधून 16 लाख 52 हजारांचा मावा जप्त; भेसळीच्या संशयावरून FDA ची कारवाई… प्रतिनिधी: नागिंद मोरे अन्न व औषध प्रशासनाने धुळे तालुका पोलिसांच्या सहकार्याने मोठी कारवाई करत लक्झरी बसमधून वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल 5 हजार 385 किलो मावा (खवा) जप्त केला आहे. या माव्याची अंदाजे किंमत 16 लाख 52 हजार 100 रुपये असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भेसळीच्या संशयावरून हा साठा जप्त करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन आणि धुळे तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने सकाळी सुमारे 6 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मोराणे हद्दीत, साक्री रोडवरील हॉटेल बालाजीजवळ संबंधित बस थांबवून…

Read More

धुळ्यात ‘पुष्पा स्टाईल’ बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त; 2.59 लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे धुळ्यात बंद पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू असलेला बनावट दारू निर्मितीचा कारखाना दारूबंदी विभागाने उध्वस्त केला आहे. या कारवाईत बनावट देशी-विदेशी दारू, तयार विदेशी ब्लेंड आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 2 लाख 59 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी फरार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास धुळे दारूबंदी विभागाकडून सुरू आहे. धुळे तालुक्यातील तिखी शिवारात बंद पोल्ट्री फार्मच्या आडून ‘पुष्पा स्टाईल’ पद्धतीने बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या…

Read More

शिरपूर तालुक्यात FDA ची धडक कारवाई; 11.32 लाखांचा गुटख्यासह 87 हजारांची मका पावडरही ताब्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड तपासणी नाका गेल्या काही वर्षांत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचा संवेदनशील मार्ग म्हणून वारंवार चर्चेत राहिला आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनांमधून कोट्यवधी रुपयांचा गुटखा, गांजा आणि अन्य प्रतिबंधित माल वेळोवेळी जप्त करण्यात आला आहे. अशा पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने हाडाखेड नाक्यावर केलेल्या ताज्या कारवाईत 11 लाख 32 हजार 600 रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त केल्याने या मार्गावरील बेकायदा वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या कठोर…

Read More

धुळ्यात LCB चा मोठा छापा; आलिशान कारसह १० तलवारी जप्त, दोघे ताब्यात प्रतिनिधी : नागिंद मोरे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आलिशान कारमधून वाहतूक करण्यात येणाऱ्या तब्बल 10 धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईत तलवारींसह आलिशान कार असा 5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना सुरतहून दोंडाईचाकडे तलवारींचा साठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने सापळा रचून संशयित आलिशान कार अडवली. कारची झडती घेतली असता त्यामध्ये 10 धारदार तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी तत्काळ तलवारींसह कार ताब्यात घेतली. या…

Read More

धुळ्यात पांझरा नदीपात्रात २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह; घातपाताच्या संशयाने खळबळ धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे धुळे शहरातील देवपूर परिसरात 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह पांझरा नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रात्री घरातून बाहेर पडलेला तरुण दुसऱ्या दिवशी नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आल्याने त्याच्या मृत्यूबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. देवपूर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 जवळील बिलाडी गावाच्या शिवारात एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. सदर तरुणाचे नाव कृष्णा लक्ष्मण चौधरी, रा. बापू भंडारी गल्ली, एकविरा देवी मंदिराजवळ, देवपूर, धुळे असे असल्याचे समोर आले. दरम्यान, कृष्णा चौधरी…

Read More

साक्रीत जेवणावरून वाद; कुऱ्हाड आणि दांडक्याने वार करत मित्राची हत्या नाल्याकाठी जेवायला गेले अन् वाद विकोपाला; ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू… कुऱ्हाड आणि लाकडी दांडक्याने डोक्यावर वार; दोन्ही संशयित काही तासांत ताब्यात… धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जेवणावरून झालेल्या वादातून मित्राची कुऱ्हाड आणि लाकडी दांडक्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिघावे गावात घडली आहे. या घटनेत चैत्राम दिलीप माळीच (वय ४०) यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चैत्राम माळीच हे प्रकाश सोनवणे आणि रोहिदास जाधव या मित्रांसोबत शेतातील नाल्याजवळ जेवण्यासाठी गेले होते. यावेळी जेवणावरून तिघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी प्रकाश सोनवणे याने कुऱ्हाडीने, तर रोहिदास जाधव याने लाकडी…

Read More

शिरपूर पोलिसांची धडक कारवाई; इराणी गँगचा सराईत आरोपी पत्नीसह जेरबंद शिरपूर, धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळपोत हिसकावून महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणाऱ्या इराणी गँगच्या सराईत आरोपीला शिरपूर शहर पोलिसांनी पत्नीसह जेरबंद केले आहे. आशु उर्फ हसन अली नियाज अली इराणी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये ३० हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिरपूर शहरातील कॉलनी परिसरात दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळपोत बळजबरीने हिसकावून नेल्याच्या घटनांनंतर शिरपूर शहर पोलिसांनी तपास सुरू केला. CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत भुसावळ आणि फैजपूर परिसरात आरोपीचा शोध घेतला. मात्र…

Read More

धुळ्यात तब्बल १६३ किलो अफूचा चुरा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई… अफूच्या चुऱ्यासह बनावट देशी दारूचा साठा जप्त; एकूण २९ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत… अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर धुळ्यात पोलिसांचा दणका… धुळ्यात अंमली पदार्थ आणि बनावट दारूविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मोहाडी उपनगरातील संजयभाऊ नगर परिसरात छापा टाकून पोलिसांनी तब्बल १६३ किलो ८३ ग्रॅम अफूचा चुरा जप्त केला आहे. तसेच बनावट देशी दारूचा साठा आणि दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मशीन व इतर साहित्यही पोलिसांनी हस्तगत केले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २९ लाख ४१ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संशयित…

Read More