धुळ्यात ‘पुष्पा स्टाईल’ बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त; 2.59 लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
धुळ्यात बंद पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू असलेला बनावट दारू निर्मितीचा कारखाना दारूबंदी विभागाने उध्वस्त केला आहे. या कारवाईत बनावट देशी-विदेशी दारू, तयार विदेशी ब्लेंड आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 2 लाख 59 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी फरार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास धुळे दारूबंदी विभागाकडून सुरू आहे.
धुळे तालुक्यातील तिखी शिवारात बंद पोल्ट्री फार्मच्या आडून ‘पुष्पा स्टाईल’ पद्धतीने बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे दारूबंदी विभागाच्या पथकाने सापळा रचून संबंधित बंद पोल्ट्री फार्मवर छापा टाकला. यावेळी बनावट दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच तयार बनावट देशी-विदेशी दारू आणि विदेशी ब्लेंड असा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
या कारवाईत एकूण 2 लाख 59 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी फरार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास धुळे दारूबंदी विभागाकडून सुरू आहे.


