Author: Team Dhule News 24

Dhule Accident: धुळे जिल्ह्यात भीषण अपघात: वऱ्हाडींची क्रुझर उलटली; 4 ठार, 12 हून अधिक जखमी साक्री (धुळे) | प्रतिनिधी साक्री तालुक्यातील तामसवाडी परिसरात वऱ्हाडींना घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझर (क्र. एमएच 18 डब्ल्यू 6226) हे वाहन शिरडाणे येथून तामसवाडी येथे लग्नकार्य आटोपून परतत होते. दुपारच्या सुमारास अक्कलपाडा परिसरात समोरून हेलकावे खात येणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे क्रुझर गाडी उलटली आणि हा भीषण अपघात घडला. व्हिडिओ बातमी पहा  https://www.instagram.com/reel/DWtZsQMkaSz/?igsh=eTZwc2xjN3UyNXJt या…

Read More

Dhule News धुळ्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांवर कारवाई; दोन व्यापाऱ्यांवर गुन्हे, 61 हजारांचा मुद्देमाल जप्त धुळे | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. जय शंकर मार्केटमधील ‘श्री साई ट्रेडर्स’चा संचालक कैलास देवानंद नानकाणी (50) तसेच सार्वजनिक मार्केट परिसरातील ‘बिग बाजार’मधील फजलू रहेमान मोहम्मद सलीम अन्सारी (32) अशी संशयितांची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची दोन…

Read More

Dhule Crime | शिरपूरात एमडी ड्रग्ज तस्करी उधळली: पोलिसांची मोठी कारवाई, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त शिरपूर शहरात एमडी ड्रग नावाने कुख्यात असलेल्या मेफेड्रोन या अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यात शिरपूर शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कारमधून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताला पोलिसांनी शिताफीने अटक केली असून या कारवाईत सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे चार लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग तसेच वापरात असलेली कार असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी शहादा फाट्यावर हॉटेल भद्रा समोर सापळा…

Read More

धुळ्यात टॅटूमुळे उलगडला खून; अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, पती-पत्नी अटकेत धुळे (प्रतिनिधी: नागिंद मोरे) : धुळे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून एका पतीने आपल्या नात्यातील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपीने पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावत तो विहिरीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अवधान एमआयडीसी परिसरातील एका विहिरीत सुमारे नऊ दिवसांपासून कुजलेल्या अवस्थेत एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र, मृताच्या हातावरील ‘Radha’ आणि छातीवरील ‘RAVI’ या टॅटूमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. त्यावरून मृताची…

Read More

धुळ्यात फरार खून आरोपी 24 तासांत जेरबंद; निष्काळजीपणामुळे दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई धुळे शहरातील मोहाडी येथील 2020 मधील राहुल मिंड खून प्रकरणातील बंदीवान आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत त्याला पुन्हा जेरबंद करण्यात आले आहे. मात्र या घटनेत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश अर्जुन सोनवणे हा आरोपी धुळे कारागृहात शिक्षा भोगत असून न्यायालयीन कोठडीत होता. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी दुपारच्या सुमारास त्याने पोलिसांच्या निगराणीवर तुरी देत तेथून पळ काढला. आरोपी फरार झाल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि त्याचा…

Read More

Dhule News: धुळे जिल्ह्यात महामार्गावर ओम्नी व्हॅनला भीषण आग; तिघे प्रवासी थोडक्यात बचावले, 2 किमीपर्यंत वाहतूक ठप्प धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर-सामोड महामार्गावर एका ओम्नी व्हॅनला अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. ही घटना आज घडली असून सुदैवाने वाहनातील तिन्ही प्रवासी सुखरूप बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्हॅन पिंपळनेरहून सामोडमार्गे साक्रीकडे जात होती. दरम्यान, प्रवासादरम्यान अचानक वाहनातून धूर निघू लागला आणि काही क्षणातच व्हॅनने पेट घेतला. परिस्थितीची जाणीव होताच वाहनातील तिघांनी तातडीने बाहेर पडत जीव वाचवला. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनाच्या वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. तसेच तीव्र उष्णता आणि दीर्घकाळ वाहन चालवणे हीदेखील संभाव्य कारणे मानली जात आहेत. घटनेची माहिती…

Read More

Dhule News सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांवर भीषण अपघात; शिरपूरजवळ स्कॉर्पिओची धडक, एका महिलेचा मृत्यू तर युवती जखमी सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांवर दुर्दैवी अपघात ओढवला आहे. शिरपूर तालुक्यातील सुळे येथील एका महिलेचा या अपघातात जागीच मृत्यू झाला असून एक युवती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील नटवाडे फाट्यालगत असलेल्या पाटील ढाब्यासमोर घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुळे (ता. शिरपूर) येथील रहिवासी सखुबाई बाबूलाल भिल (वय ३५) आणि मनीषा कालूसिंग पावरा (वय १६) या दोघी काल (दि. २६) वणी येथील सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी निघाल्या होत्या. सकाळी सुमारे ११.१५ वाजेच्या सुमारास त्या नटवाडे फाट्याजवळील पाटील ढाब्यासमोरून…

Read More

साक्रीत सौर ऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश; 6.97 लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पातून कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 6 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते 24 जानेवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान साक्री तालुक्यातील कारखाने छाईल परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 45 हजार रुपयांचा कॉपर केबल चोरी करून नेला होता. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय…

Read More

Dhule Crime: रामकृष्ण नगरात घरफोडी, सोन्याची माळ व घरातील सामान चोरी धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामकृष्ण नगर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण नगर येथील प्लॉट क्रमांक 77 मध्ये राहणारे फर्निचर व्यावसायिक प्रकाश पंढरीनाथ बोरसे हे एका विवाह सोहळ्यानिमित्त बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर घरातील कपाटाची तोडफोड करून चोरट्यांनी सामानाची उचकापाचक केली. कपाटात ठेवलेली 5 ग्रॅम सोन्याची माळ, 2 पितळी पातेले, 2 तांब्याच्या घागरी आणि 2 स्पीकर असा…

Read More

Dhule News: धुळे LCB ची मोठी कारवाई: दोन मोटारसायकल चोर अटकेत; चोरीच्या 8 मोटारसायकली जप्त धुळे जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या एकूण 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची एकूण किंमत सुमारे 3 लाख 10 हजार रुपये इतकी आहे. धुळे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे…

Read More