Dhule News: साक्रीत दुर्दैवी घटना! बहिणीच्या लग्नाच्या तयारीत असताना 17 वर्षीय भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बोरगाव येथे बहिणीच्या लग्नाच्या तयारीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली असून, विजेचा धक्का लागून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोशन ठाकरे (वय 17) हा आपल्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या मंडपासाठी उंबराच्या झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढला होता. मात्र झाडाच्या वरून गेलेल्या इलेक्ट्रिक मेन लाईनच्या तारा त्याच्या नजरेस पडल्या नाहीत. फांदी तोडताना त्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि त्याला जोरदार शॉक लागला. या धक्क्यामुळे रोशन झाडावरून खाली कोसळला. घटनेनंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी…
Author: Team Dhule News 24
Dhule Fake Milk; शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार; दूध उकळताच झाले रबरसारखे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केले होते. मात्र हे दूध उकळल्यानंतर संपूर्ण दूध रबरसारख्या गोळ्यात बदलल्याचे आढळून आले. दूध गरम करताच त्यामध्ये विचित्र बदल दिसून आला आणि काही वेळातच ते दूध रबरसारख्या गोळ्यात परिवर्तित झाले. तयार झालेला हा गोळा हाताने तुटू लागल्याने दुधामध्ये भेसळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार पाहून आशाबाई बोरसे यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे त्या नेहमीच्या दूधवाल्याकडूनच दूध…
धुळेकर दुबईत सुखरूप: इराण–अमेरिका–इस्रायल तणावामुळे परतीची उड्डाणे रद्द धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे इराण–अमेरिका–इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात आल्याने अनेक उड्डाणांचे वेळापत्रक बदलले असून काही सेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. या परिस्थितीचा परिणाम धुळ्यातील काही तरुणांच्या परतीच्या प्रवासावर झाला असून दुबईहून भारतात येणारे त्यांचे विमान रद्द झाले आहे. सुरुवातीला कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली होती; मात्र सर्व तरुण पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. धुळेकर मोंटी पाटील यांनी दुबईतील परिसरातून तसेच येथून थेट व्हिडिओ संदेश पाठवत सर्वजण सुखरूप असल्याचे सांगितले. सध्या दुबईतील परिस्थिती शांत असून कोणतीही भीती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानसेवा पुन्हा सुरळीत…
धुळे महानगरपालिका अंतर्गत 35 पदांची भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती!! धुळे महानगरपालिकेत विविध आरोग्य विभागातील पदांसाठी ३५ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे. 📌 भरतीचा तपशील एकूण पदसंख्या: ३५ जागा नोकरी ठिकाण: धुळे निवड प्रक्रिया: थेट मुलाखत मुलाखतीची तारीख: १३ मार्च २०२६ मुलाखतीचा पत्ता: मुख्य टपाल शाखा, पहिला मजला, मालमत्ता कर विभागाजवळ, नवीन प्रशासकीय इमारत, धुळे महानगरपालिका अधिकृत वेबसाईट: www.dhulecorporation.org 📋 पदनिहाय जागा पदाचे नाव पदसंख्या औषध निर्माता 05 प्रयोगशाळा तज्ञ 03 लॅब असिस्टंट 02 सार्वजनिक आरोग्य परिचारिका 03 परिचारिका 07 ए.एन.एम. 01 अन्न निरीक्षक 01 ड्रेसर 03 दाई 10 🎓 शैक्षणिक पात्रता (संक्षिप्त)…
धुळे पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’ : एका रात्रीत 23 ठिकाणी नाकाबंदी, अवैध धंद्यांवर मोठी कारवाई धुळे | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यात वाढत्या टवाळखोरीला, अवैध धंद्यांना आणि असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार मंगळवारी सायंकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेच्या पथकांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील तब्बल २३ ठिकाणी नाकाबंदी करून शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे सार्वजनिक…
धुळे धक्कादायक: लग्नाच्या तीन दिवस आधी कासारेतील भावी नवरदेवाचा इलेक्ट्रिक शॉकने मृत्यू धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. लग्नाच्या तयारीत असलेल्या भावी नवरदेवाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. कासारे येथील आदिवासी समाजातील युवक धनु बाजीराव माळचे याचे 25 फेब्रुवारी रोजी लग्न ठरले होते. घरात आनंदाचे वातावरण असताना लग्नाची तयारी सुरू होती. मात्र घराची साफसफाई करत असताना धनु माळचे यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.…
धुळे; शिवजयंतीनिमित्त फागणे गावात भव्य शिव विचार निबंध स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 📰 फागणे | प्रतिनिधी शिवजयंतीनिमित्त फागणे गावात शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘शिव विचार’ निबंध स्पर्धा तसेच शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सुदीप फाउंडेशन फागणे आणि उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन फागणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सरस्वती कन्या विद्यालय येथे पार पडला. तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची व कार्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. शिव व्याख्याते सदाशिव सूर्यवंशी यांनी शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य व पोवाडे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे…
धुळ्यात भाजपचे आंदोलन: हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध, प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त धुळे | प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणारे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात भाजपकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील महाराणा प्रताप पुतळा परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. या आंदोलनात धुळे शहराचे आमदार उपस्थित होते. यावेळी आमदार अनुप अग्रवाल बोलताना म्हणाले की, “कोट्यवधी हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषाशी होऊच शकत नाही. हे वक्तव्य संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे…
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026: 64 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू 📌 भरतीची थोडक्यात माहिती पदांचे नाव: लिपिक, तांत्रिक एकूण पदसंख्या: 64 नोकरी ठिकाण: धुळे वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे अर्ज पद्धत: ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 14 मार्च 2026 🎓 शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. 👉 सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात (PDF) वाचणे आवश्यक. 📝 How To Apply – अर्ज प्रक्रिया 🔹 या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 🔹 अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. 🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०२६ आहे. 🔹 अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 🔗 महत्त्वाच्या लिंक्स…
साक्री धुळे: मारहाण प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुस्लिम समाजाचे ठिय्या आंदोलन साक्री, धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे साक्री शहरात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर काही तरुणांवर दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी आज मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातून निघालेला हा महामोर्चा थेट साक्री पोलिस ठाण्याच्या आवारात पोहोचला, जिथे मोर्चेकऱ्यांनी सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. कबुतरांच्या वादातून साक्रीत एका तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, दोंडाईचा येथील नगरसेवक नबु पिंजारी साक्रीत आले असता त्यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेनंतर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत…

