धुळ्यात १२ हजारांची लाच स्वीकारताना दोन तलाठी आणि खाजगी पंटर रंगेहाथ अटकेत गौणखनिज वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी; एसीबीची चाळीसगाव चौफुली परिसरात कारवाई… धुळ्यात गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाकडून खाजगी पंटरच्या माध्यमातून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन तलाठी आणि एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे धुळे जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. धुळे तहसील कार्यालयातील तलाठी दिनेश दिलवर दाभाडे, बाळापूरचे तलाठी मृणाल शरद नगराळे आणि खाजगी पंटर जयेश कैलास चौधरी अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराचा बांधकाम साहित्य वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांचे हायवा वाहन धुळ्यातील साक्री रोडवर थांबले होते. यावेळी तलाठी दाभाडे आणि…
Author: Team Dhule News 24
धुळे : शिरपूरमध्ये 90 गुंठ्यांवर गांजाची बेकायदा शेती; 7 कोटी 68 लाखांचा गांजा जप्त शिरपूर, धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे ९० गुंठ्यांवर बेकायदा लागवड; ३ हजार ७२ किलो गांजाची झाडे पोलिसांच्या हाती शिरपूर तालुक्यात गांजाच्या बेकायदा शेतीवर पोलिस आणि वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. भोरखेडा, रोहिणी आणि खंबाळे परिसरातील अतिदुर्गम भागात तब्बल ९० गुंठे क्षेत्रावर गांजाची लागवड करण्यात आल्याचे या कारवाईत समोर आले आहे. शिरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिस ठाणे आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित परिसरात छापा टाकला. या कारवाईत एकूण ३ हजार ७२ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात…
Dhule News: महाविद्यालयांच्या परिसरातील अवैध गुटखा विक्रीविरोधात तरुणाई आक्रमक युवासेना आणि विद्यार्थ्यांचे जोरदार निदर्शने; विक्रेत्यांवर तत्काळ कारवाईची मागणी धुळे | प्रतिनिधी : शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध गुटखा, मावा आणि नशायुक्त पदार्थांच्या विक्रीविरोधात तरुणाई आक्रमक झाली. युवासेनेच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच युवक-युवतींनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. गुटखा विक्री करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून शैक्षणिक परिसर व्यसनमुक्त करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील काही शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात १०० मीटरच्या आत असलेल्या टपऱ्यांवर गुटखा, मावा आणि इतर नशायुक्त पदार्थांची कथितपणे विक्री होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पदार्थांच्या सहज उपलब्धतेमुळे विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता असून, त्यांच्या आरोग्यावरही…
श्री सत्यसाईबाबा जन्मशताब्दीनिमित्त धुळे जिल्ह्यात रथोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रम धुळे | प्रतिनिधी श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त श्री सत्यसाई सेवा संघटना, धुळे जिल्हा शाखेतर्फे 19 ते 23 जुलै दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी रथोत्सव तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रथोत्सवादरम्यान वेदपठण, भजन, दिव्य पादुका पूजन व दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, दिव्य महारथ मिरवणूक, कलशयात्रा, महाआरती आणि महाप्रसाद यांसारखे विविध कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचे वेळापत्रक : 19 जुलै – विंचूर (ता. धुळे) 20 जुलै – सकाळी हेंदून-मोघण (ता. धुळे), सायंकाळी वैभवनगर (धुळे) 21 जुलै – आग्रा रोड (धुळे शहर) रथयात्रा, प्रोफेसर कॉलनी, देवपूर आणि सायंकाळी वडेल (ता. धुळे) 22…
धुळ्यात मंदिरातील चोरीचा अवघ्या काही तासांत छडा; पाठलाग करून आरोपीला रंगेहात अटक धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे धुळे शहरातील दसरा मैदान परिसरातील एका मंदिरात चोरी करून पसार झालेल्या आरोपीला धुळे शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी 15 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे मंदिरातील दानपेटी फोडून रोकड आणि चांदीचे साहित्य चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली. रेल्वे वसाहतीजवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मंदिरातील चोरीची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव…
धुळे एलसीबीची मोठी कारवाई; 12 किलो गांजासह दोघांना अटक, 3.50 लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करत 12 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धुळे शहरातील विश्वकर्मा भवन परिसरात सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान निखिल गोकुळ पाटील आणि चेतन जीवन पावरा यांच्या ताब्यातून 3 लाख रुपये किमतीचा 12 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात…
धुळ्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनरच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर धुळे | प्रतिनिधी: नागिंद मोरे धुळे शहरातील सुरत बायपास रिंगरोडच्या सुरुवातीला, सिव्हिल हॉस्पिटलजवळील हॉटेल आदर्शसमोर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पुरमेपाडा येथील रहिवासी जितेश ऊर्फ मयुर नंदलाल कुलकर्णी (वय 36), पत्नी मोनाली मयुर कुलकर्णी (वय 30) आणि मुलगा खुशाल मयुर कुलकर्णी (वय 5) हे दुचाकीने धुळ्याकडे येत होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जितेश कुलकर्णी आणि त्यांचा पाच वर्षीय मुलगा…
धुळे; आईचे सोने हडपण्याचा प्रयत्न; मुलीनेच रचला चोरीचा बनाव; पश्चिम देवपूर पोलिसांकडून गुन्हा उघड खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल; महिला अटकेत, 90.30 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त धुळे | प्रतिनिधी धुळे शहरातील वलवाडी परिसरात घरातून 5 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार करणाऱ्या महिलेचाच चोरीचा बनाव असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आईचे सोने हडप करण्यासाठी खोटी फिर्याद देत पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी सोनल भास्कर बागले हिला पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वलवाडीतील सुंदरनगर येथील घरातून आई कस्तुरीबाई यांच्या मालकीचे 90.30 ग्रॅम वजनाचे, 5.60 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली…
धुळे-नंदुरबार मार्गावर भीषण अपघात; एसटी बसला मालवाहू ट्रेलरची जोरदार धडक, चालक गंभीर जखमी 30 ते 40 प्रवाशांचे थोडक्यात बचाव; अपघातानंतर ट्रेलर चालक फरार धुळे | प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळ धुळे-नंदुरबार मार्गावर एसटी बस आणि मालवाहू ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बस चालक अनिल देवरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. बसमधील सुमारे 30 ते 40 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, धुळेहून नंदुरबारकडे जाणारी एसटी बस चिमठाणे परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रेलरने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर…
शिरपूर पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणारे तिघे जेरबंद, 2.27 लाखांचा मुद्देमाल जप्त शिरपूर | प्रतिनिधी : नागिंद मोरे शिंगावे शिवारातील फुलेनगर येथे बंद घर फोडून एलईडी टीव्ही व मोबाईल चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरांच्या टोळीला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल आणि कारसह एकूण 2 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुलेनगर येथील रहिवासी किरण ठाकूर यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी एलईडी टीव्ही आणि मोबाईलची चोरी केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच शिरपूर पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान भूपेश नगर परिसरात संशयास्पदरीत्या फिरणारी GJ 26 AE 3354 क्रमांकाची कार अडवली. कारमधील जयेश…

