श्री सत्यसाईबाबा जन्मशताब्दीनिमित्त धुळे जिल्ह्यात रथोत्सवासह विविध धार्मिक कार्यक्रम
धुळे | प्रतिनिधी
श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त श्री सत्यसाई सेवा संघटना, धुळे जिल्हा शाखेतर्फे 19 ते 23 जुलै दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी रथोत्सव तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रथोत्सवादरम्यान वेदपठण, भजन, दिव्य पादुका पूजन व दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, दिव्य महारथ मिरवणूक, कलशयात्रा, महाआरती आणि महाप्रसाद यांसारखे विविध कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमाचे वेळापत्रक :
- 19 जुलै – विंचूर (ता. धुळे)
- 20 जुलै – सकाळी हेंदून-मोघण (ता. धुळे), सायंकाळी वैभवनगर (धुळे)
- 21 जुलै – आग्रा रोड (धुळे शहर) रथयात्रा, प्रोफेसर कॉलनी, देवपूर आणि सायंकाळी वडेल (ता. धुळे)
- 22 जुलै – कुंडाणे
- 23 जुलै – सकाळी अजंग, सायंकाळी बाळापूर व फागणे. बाळापूर येथे सायंकाळी 5 ते 6 या वेळेत रुद्राभिषेक आयोजित करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील साईभक्त व ग्रामस्थांनी या रथोत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सत्यसाई सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश साळुंखे यांनी केले आहे.


