Author: Team Dhule News 24

धुळे; प्रभाग 4 मध्ये हजारो मतदान कार्डांचा साठा सापडल्याने खळबळ; एमआयएमचा राष्ट्रवादीवर आरोप धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत आढळल्याचा दावा करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा प्रकार एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला असून, याबाबत त्यांनी प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. एमआयएमच्या कार्यकर्त्यांना एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान कार्डांचा साठा आढळून आला. ही बाब समोर येताच एमआयएमने या प्रकरणावर संशय व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या मतदान कार्डांचा नेमका स्रोत काय आहे आणि ते तिथे कसे आले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी पक्षाच्या वतीने…

Read More

शिरपूरमध्ये पतंगाच्या नायलॉन मांजामुळे चार वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरला; 15 टाके, प्रकृती स्थिर धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात नायलॉन मांजामुळे घडलेली धक्कादायक घटना समोर आली आहे. पतंगाच्या मांजाने चार वर्षांच्या कपिल पिंपळे या चिमुकल्याचा गळा चिरला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. कपिल आपल्या नातेवाईकांसोबत मोटरसायकलवरून जात असताना अचानक रस्त्यात आडवा आलेला मांजा त्याच्या गळ्यात अडकला आणि जोरदार रक्तस्राव झाला. या अपघातात कपिलच्या गळ्यावर सुमारे 12 सेंटीमीटर खोल जखम झाली. त्याला तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत 14 ते 15 टाके घालून त्याचा जीव वाचवला. सध्या कपिल आयसीयूमध्ये असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय…

Read More

धुळ्यात वडजाई रोड परिसरात एलसीबीचा छापा; पिस्तुल व जिवंत काडतुसासह आरोपी अटकेत धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सलग दुसऱ्या दिवशी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीवर धडक कारवाई केली आहे. वडजाई रोडवरील कबीरगंज परिसरात एका युवकाकडून देशी पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार अवैध शस्त्रांवर विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत 11 जानेवारी 2026 रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अपली हॉटेलसमोर सापळा रचण्यात आला. त्यावेळी आसीफ अहमद खलील अहमद अन्सारी (वय 31, रा. बंदे नवाज कॉलनी,…

Read More

धुळ्यात दारू तस्करांना मोठा दणका ₹30.17 लाखांची अवैध देशी दारू जप्त धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान धुळे तालुका पोलिसांनी अवैध दारू तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रकवर छापा टाकून रॉकेट ब्रँडची देशी दारू, वाहनांसह एकूण ₹30,17,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. 10 जानेवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांना पारोळा ते धुळे मार्गावरून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर, विशेष पथक तयार करून मुकटी (ता. धुळे) परिसरात सापळा रचण्यात आला. रात्री 1 ते…

Read More

धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त धुळे | प्रतिनिधी धुळे शहरातील गुरुद्वारा हिंसाचार आणि अडवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या मुख्य आरोपी रणबीरसिंग सुखदेवसिंग खालसा यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. धुळे पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपीच्या गुरुद्वारातील निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमांतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणानंतर रणबीरसिंग खालसा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी त्याच्या गुरुद्वारातील घराची झडती घेतली असता धक्कादायक पुरावे हाती लागले. झडतीदरम्यान ८ एमएम (KF) प्रकारच्या ८ जिवंत गोळ्या, एसएलआर रायफलसारख्या…

Read More

महाराष्ट्रातील मुसलमानांचा सर्वात मोठा नेता इम्तियाज जलील; धुळ्यात ओवेसी यांचे वक्तव्य धुळे | प्रतिनिधी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात एमआयएम पक्ष प्रमुख तथा खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना ओवेसी यांनी खासदार इम्तियाज जलील यांचे जोरदार कौतुक करत त्यांना “महाराष्ट्रातील मुसलमानांचा सर्वात मोठा नेता” असे संबोधले. ओवेसी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये इम्तियाज जलील यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे नेतृत्व आणि जनाधार कमी झालेला नाही. निवडणुकीत पराभव झाला म्हणून नेतृत्व संपत नसते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी ओवेसी यांनी महायुतीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. अजित पवार यांच्यावर बोलताना…

Read More

धुळे शहरातील प्रभाग ७ मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचे बॅनर फाडल्याची घटना; कठोर कारवाईची मागणी धुळे | प्रतिनिधी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात राजकीय वातावरण तापले असून, संबंधित उमेदवारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून, मतदारांपर्यंत नाव आणि निवडणूक चिन्ह पोहोचावे यासाठी बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. मात्र प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचे लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडून टाकल्याचे निदर्शनास आले आहे. या…

Read More

शिरपूर तालुक्यात भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील भोरखेडा गावाजवळ रस्ते विकासाच्या कामादरम्यान एका भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत नकुल दीपक चौधरी आणि हर्षल दीपक चौधरी या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे भोरखेडा परिसरासह संपूर्ण शिरपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थंडीच्या कडाक्यात दोन्ही भाऊ रस्त्यालगत असलेल्या चहाच्या स्टॉलजवळ थांबलेले असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तरुण वयातील दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या…

Read More

धुळ्यात दोन गटांत धुमश्चक्री; गोळीबार व कोयत्यांचे वार, चौघे जखमी; परस्पर गुन्हे दाखल, सहा अटकेत धुळे : महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी (दि. २) धुळे शहरात निवडणूक वादातून रक्तरंजित संघर्ष उफाळून आला. देवपूर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत गोळीबार, कोयत्यांचे वार आणि जीवघेणे हल्ले झाल्याने शहरात खळबळ उडाली. या घटनेत चौघे जण जखमी झाले असून देवपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या फिर्यादीत गौरव रमेश नरोटे (रा. नेहरुनगर, देवपूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी उमेदवारी माघारीच्या प्रक्रियेदरम्यान रामनगर पाण्याच्या टाकीजवळ वाद झाला. त्यानंतर दुपारी नेहरुनगर शनिमंदिर परिसरात पुन्हा दोन गट समोरासमोर आले. यावेळी काही…

Read More

Dhule News धुळ्यात भाजपची विजयाची घोडदौड; प्रभाग १७ मधून अमोल मासुळे बिनविरोध, ४ जागा खिशात! धुळे | प्रतिनिधी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने निवडणूकपूर्वीच आघाडी घेतली असून आतापर्यंत पक्षाचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेत सातत्याने माघारी होत असल्याने भाजपाच्या विजयाची घोडदौड सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. काल तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर, आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक १७ मधून अमोल मासुळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाने निवडणुकीपूर्वीच चार नगरसेवकांची संख्या निश्चित केली असून यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये धाकधूक वाढली…

Read More