धुळे; फागणे गावातून जाणाऱ्या सर्व बसेसना थांबा द्या; संघर्ष समितीचे एसटी अधिकाऱ्यांना निवेदन
धुळे | प्रतिनिधी : नागिंद मोरे
महामार्गावर असूनही फागणे गावात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस थांबत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. बस थांबा नसल्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अनेकांना खासगी वाहनांतून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी ‘संघर्ष समिती’ची स्थापना केली असून, समितीच्या वतीने आज एसटी महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. फागणे गावातून जाणाऱ्या सर्व जलद व अतिजलद बसेसना तात्काळ थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
गावात बस थांबल्यास विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित व सवलतीच्या प्रवासाचा लाभ मिळेल, असे ग्रामस्थांनी सांगितले. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.
निवेदन देण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने जेष्ठ महीला सामाजिक कार्यकर्ता व माजी प्राचार्या सौ. रत्नाताई पाटील, इंजि. श्री युवराज आबा सुर्यवंशी, प्रा. सुरेश बडगुजर, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री शशिकात सुर्यवंशी , डॉ. कुणाल पाटील , श्री अंकुश नंदवाळकर ,श्री नागराज पाटील,श्री गणेश बडगुजर ,श्री पंकज सुराणा ,श्री ज्ञानेश्वर ( नानु ) सुर्यवंशी ,श्री आशिष देसले ,श्री तुषार भागवत पाटील ,चि. हिमांशु अहिरे व चि. हर्षल चौधरी उपस्थित होते


