धुळे; शेतकऱ्यांच्या बांधावर राष्ट्रवादीचे नेते; समस्या जाणून घेत शासनाकडे प्रश्न मांडण्याची ग्वाही
धुळे | प्रतिनिधी :
धुळे तालुक्यातील सोनेवाडी, शिरपूर तालुक्यातील करवंद, कान्हेरीपाडा, आनंदपाडा तसेच शिंदखेडा तालुक्यातील जोगशेलू, सोनेवाडी आणि विरदेल येथे दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी करण्यात आली.
यावेळी शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांशी संवाद साधून परिसरातील पावसाचे प्रमाण, पावसातील खंड, पिकांची वाढ तसेच संभाव्य नुकसान याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली.
परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि विविध समस्या जाणून घेतल्या.
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे तसेच संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आपली बांधिलकी असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
‘बळीराजाच्या संघर्षात सदैव साथ!’ असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पाहणीदरम्यान धुळे ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पाटील, युवक जिल्हा कार्याध्यक्ष रुबाब पिंजारी, युवक जिल्हा उपाध्यक्ष युवक जिल्हा कार्यकारणी व शेतकरी बांधव उपस्थित होते इतक टाका यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.


