धुळ्यात पोलिसांची मोठी कारवाई; बनावट मद्याचा मिनी कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाडा…
बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त…
गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आला असून आज दुपारच्या सुमारास धुळे शहरातील सहजीवन नगर भागामध्ये बनावट दारूच्या मिनी कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे संशयित आरोपी गणेश निकम हा संशयित सदर आपल्या राहत्याच घरी बनावट दारू तयार करण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिले आहे…
धुळे शहरातील शासकीय दुध डेअरी परिसरात असलेल्या सहजीवन नगर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह त्यांच्या पथकाने छापा टाकला असता यामध्ये बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे 800 लिटर स्पिरिट, विविध मद्याच्या नामांकित कंपन्यांचे बुच तसेच यासह इतर वस्तू असा एकूण जवळपास चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या ठिकाणाहून हस्तगत केला आहे…