गणेश चतुर्थीसाठी व्हॉट्सॲप स्टिकर्स कसे डाऊनलोड करावे?
यावर्षी गणेश चतुर्थी २६ आणि २७ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. जर तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि कुटुंबियांना खास पद्धतीने शुभेच्छा द्यायच्या असतील, तर व्हॉट्सॲप स्टिकर्स हा एक चांगला पर्याय आहे. हे स्टिकर्स तुम्ही सोप्या पद्धतीने डाऊनलोड करून वापरू शकता.
१. स्टिकर पॅक डाऊनलोड करणे:
* तुमच्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोअर (अँड्रॉइडसाठी) किंवा अॅप स्टोअर (आयफोनसाठी) ओपन करा.
* सर्च बारमध्ये ‘गणेश चतुर्थी व्हॉट्सॲप स्टिकर्स’ किंवा ‘Ganesh Chaturthi WhatsApp Stickers’ असे टाइप करा.
* सर्च रिझल्टमधून तुम्हाला आवडणारा स्टिकर पॅक निवडा आणि तो डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
* अॅप इन्स्टॉल झाल्यावर ते ओपन करा आणि ‘Add to WhatsApp’ या बटणावर टॅप करा. असे केल्याने हे स्टिकर्स थेट तुमच्या व्हॉट्सॲप स्टिकर कलेक्शनमध्ये जमा होतील.
२. व्हॉट्सॲप चॅटमध्ये स्टिकर्स कसे पाठवावे?
* व्हॉट्सॲप ओपन करून ज्या चॅटमध्ये स्टिकर पाठवायचे आहे, तिथे जा.
* टेक्स्ट बॉक्समधील इमोजी आयकॉनवर टॅप करा.
* आता सर्वात खाली दिसणाऱ्या स्टिकर टॅबवर (स्क्वेअर आयकॉन) क्लिक करा.
* तुम्ही नुकतेच डाऊनलोड केलेले गणेश चतुर्थीचे स्टिकर्स येथे दिसतील.
* कोणत्याही स्टिकरवर टॅप करा, तो लगेच तुमच्या चॅटवर पाठवला जाईल.
इतर सोशल मीडियावरही वापरा स्टिकर्स
तुम्ही डाऊनलोड केलेले हे स्टिकर्स फक्त व्हॉट्सॲपवरच नाही तर इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही वापरू शकता. यासाठी, स्टिकरची इमेज फोनमध्ये सेव्ह करून घ्या किंवा थेट थर्ड-पार्टी ॲपच्या मदतीने शेअर करा.
अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या सणाचा आनंद डिजिटल माध्यमातून सर्वांसोबत शेअर करू शकता.