Dhule आग्रा ते राजगड शिवज्योत यात्रेचे धुळ्यात जंगी स्वागत; ‘गरूडझेप मोहिमे’त दोन हजार मावळे सहभागी
गरूडझेप मोहिम संस्थेने आग्रा ते राजगड हे 1 हजार 310 किलोमीटर पायी मोहीम शिवज्योत 17 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. 27 ऑगस्टला राजगडावर पोहचेल. आज या शिवज्योतचे धुळे शहरात आगमन होताच नागवबारी परिसरात अनेक सामाजिक, राजकीय संघटनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले… रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाची घटना म्हणजे आग्रा भेट आहे… आग्राहून औरंगजेबाच्या तब्बल 99 दिवसांच्या कैदेतून राजगडाच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुडझेप ही या ऐतिहासिक घटनेची नोंद जगभरातील तत्कालीन राज्यकत्यांनी घेतली होती.
इतिहासाला कलाटणी देणारी, विशेषतः मराठ्यांच्या इतिहासात अजरामर ठरलेली घटना आहे. 17 ऑगस्ट 1666 हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. राजांच्या या पराक्रमाला अभिवादन, या देदीप्यमान इतिहासाचे स्मरण आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहोचवण्यासाठी ही मोहीम पाच वर्षांपासून सुरु आहे. या मोहिमेत दोन हजार मावळे सहभागी झाले असल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख मारुती गोळे यांनी दिली….