मराठा आरक्षणासाठी धुळ्यातून हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने; ‘धुळे-मेमो’ ट्रेनने करणार कूच
धुळे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला धुळ्यातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर धुळे जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव आज मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत.
मराठा समाज मुंबईकडे रवाना
मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, धुळ्यातील मराठा बांधव उद्या (२९ ऑगस्ट २०२५) सकाळच्या सुमारास हजारोंच्या संख्येने ‘धुळे-मेमो’ (MEMU) ट्रेनने मुंबईकडे रवाना होणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने समाजात असंतोष वाढत आहे.
याबद्दल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक निंबा मराठे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरकारला मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घ्यावीच लागेल.”
मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, धुळ्यातून निघालेल्या या आंदोलनामुळे मुंबईतील आंदोलनाला आणखी बळ मिळणार आहे.