धुळ्यातील अग्रवाल नगर मित्र मंडळाने कागदाचा लगदा आणि मुलतानी माती यापासून साकारली गणेशमूर्ती..
अग्रवाल नगर येथील अग्रसेन चौक मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम… पर्यावरणासंदर्भात दिला अनोखा संदेश देत इको फ्रेंडली 19 फूट उंचीची गणपतीच्या मूर्तीची स्थापना
धुळे शहरातील अग्रवाल नगर भागातील अग्रसेन चौक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो… यंदाच्या 20 व्या वर्षी साजरा होत असलेल्या गणेशोत्सवा सोबत सामाजिक उपक्रमाचे देखील दहा दिवस आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येत असते. यंदा देखील अग्रवाल नगर अग्रसेन चौक मित्रमंडळाने गणेश उत्सव साजरा केला असून यंदा या मंडळाची 19 फूट उंचीची गणेश मूर्ती शहरात चर्चेचा विषय ठरली आहे… पर्यावरण पूरक असलेली ही 19 फूट उंचीची गणेश मूर्ती कागदी पेपर तसेच मुलतानी माती आणि पर्यावरण पूरक कलर यापासून बनवण्यात आली असून पर्यावरण पूरक असलेली ही मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे…. मुंबई येथून ही मूर्ती तयार करण्यात आली असून वजनाला अतिशय हलकी आणि आकर्षक अशी ही मूर्ती आहे…
धुळे शहरातील अगस्ती नगर मध्ये असलेल्या अग्रसेन चौक मित्र मंडळाच्या वतीने इको फ्रेंडली 19 फूट उंचीची गणेश मूर्ती स्थापन करून पर्यावरणाचा अनोखा संदेश हा इतर मंडळांना ही दिला आहे… त्यामुळे इतर गणेश मंडळांनी येणाऱ्या काळामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मुर्त्या न बसवता पर्यावरण पूरक अशा शाडू माती किंवा कागदापासून तयार करण्यात आलेल्या गणेशाच्या मुर्त्या बसवून पर्यावरणाचे संरक्षण करावे असाच अनोखा संदेश या मंडळाच्या माध्यमातून देण्यात आला आहे..