अक्षल फाउंडेशनच्या वतीने अंध विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि शालेय साहित्याचे वाटप
धुळे: अक्षल फाउंडेशन, धुळे या सामाजिक संस्थेने एका प्रेरणादायी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थेच्या वतीने, कु. अक्षल शिरसाठ हिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त येथील संतोषी माता चौकातील अंध विद्यार्थी शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या छोट्याशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अक्षल फाउंडेशनने या वेळी विद्यार्थ्यांना कार्डशीटचे वाटप केले. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी, मच्छिंद्र देवरे (जि. प. शिक्षक, रत्नागिरी), शुद्धोधन खैरनार, लुंबिनी शिरसाठ आणि कु. अक्षल शिरसाठ हे उपस्थित होते. आयोजकांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.