धुळेकरांनो सावधान! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
धुळे, १ सप्टेंबर: धुळे जिल्ह्यात पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर या कालावधीत दररोज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने ही शक्यता जास्त असल्याचे स्पष्ट केले असून, नागरिकांनी या काळात योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.