थकीत वेतन मिळावे यासाठी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनाचा इशारा…
धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांचा गेल्या दोन महिन्यांपासून पगार एक वर्षाचा पीएफ तसेच बोनस थकीत असून धुळे महापालिका व संबंधित ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आज सफाई कर्मचाऱ्यांनी केला. धुळे महानगरपालिकेच्या असलेल्या कचरा व्यवस्थापन डेपो या ठिकाणी शेकडो सफाई कर्मचाऱ्यांनी दोन महिन्याचा थकीत वेतन द्या अन्यथा उद्यापासून काम बंद आंदोलन करू असा इशारा देत धुळे महानगरपालिका व संबंधित ठेकेदार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली…
जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा सफाई कर्मचाऱ्यांचा पगार थकला असून गेल्या एक वर्षापासून पीएफ व बोनस मिळत नसल्याने सफाई कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहे. धुळे महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी हे आपल्या आरोग्याची परवा न करता धुळे महानगरपालिका आदमी मधील सफाईची कामे करीत असतात मात्र त्यांना संबंधित ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारची साधनसामुग्री पुरवली जात नाही. तसेच घंटागाडी व ट्रॅक्टर हे देखील नादुरुस्त असून त्याची देखील देखभाल संबंधित ठेकेदार करीत नाही त्यामुळे अनेक अडचणींना या सफाई कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते असा गंभीर आरोप करीत आमचे थकीत वेतन लवकरात लवकर दिले नाही तर उद्यापासून संपूर्ण सफाई कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा गंभीर्षाला त्यांनी यावेळी दिला….