
धुळे तालुक्यातील फागणे गावात शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा भव्य सत्कार


धुळे तालुका (प्रतिनिधी) :
शिक्षक दिनानिमित्त धुळे तालुक्यातील फागणे गावात सुदीप फाऊंडेशन व उत्तर महाराष्ट्र युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास गावातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

सुदीप फाऊंडेशनचे Dr. कुणाल पाटील, वाल्मीक पाटील, नागराज पाटील, विक्रम दादा सूर्यवंशी, रामेश्वर पाटील, निखिल पवार, सागर पवार, रोहित पाटील, बंटी नारायण पाटील, संदीप पाटील, भूषण पाटील

उत्तर महाराष्ट्र युवा फाऊंडेशनचे संदीप साळुंखे, भूषण सूर्यवंशी, शुभम पाटील, योगेश देसले, योगेश सूर्यवंशी, पंकज सूर्यवंशी, उमेश सूर्यवंशी, हेमंत पाटील, नितीन चौधरी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
यावेळी प्रभाकर शेळके, शांताराम वानखेडे, गोपीचंद सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, दगडू कापडणीस, सुभाष देसले, श्रीराम जाधव, शिवाजी अहिरे, चंद्रकांत जाधव, शरद सूर्यवंशी, N.D. सूर्यवंशी, कोठावदे सर, प्रमोद चौधरी, प्रशांत बडगुजर, अमोल नांदवलकर, सागर पाटील, भटू सूर्यवंशी, गुलाब वाघ यांच्यासह इतर सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी शिक्षकांचे योगदान अधोरेखित करत “शिक्षक हे समाज घडविणारे शिल्पकार असून त्यांच्यामुळेच भावी पिढी योग्य मार्गावर जाते” असेy प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरीत्या पार पडल्याबद्दल सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.


