जि.प.विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात,अभ्यासिका, वाचनालय, व्यायाम शाळेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ध नग्न आंदोलन….
नवीन प्रशासकीय इमारत तयार असताना विद्यार्थ्यांना शिकावे लागते पडक्या इमारती…
धुळे तालुक्यातील वनी बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिकत असल्याची बाब समोर आली असून जिल्हा परिषद प्रशासनाची नवी इमारत तयार असताना देखील विद्यार्थ्यांना पडक्या इमारतीत शिकवले जात असल्याचा आरोप येथील विद्यार्थ्यांनी केला असून विद्यार्थ्यांनी आज अर्धनग्न आंदोलन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासिका वाचनालय व्यायामशाळा सुविधा देखील उपलब्ध करावी अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केले आहे… गावातील विद्यार्थ्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी थेट ग्रामपंचायती समोरच अर्ध नग्न आंदोलन केले जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे…
तर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याने येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक, शिक्षक देखील दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तर यावेळी या आंदोलनात समाधान पाटील,मयूर पाटील भावेश मासुळे, जयेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संदीप पाटील, तन्मय पाटील, राहुल पाटील आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते..