
Dhule News मुसळधार पावसामुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत


धुळे: धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाची प्रतीक्षा संपल्यानंतर आता अतिवृष्टीमुळे पिके धोक्यात आली आहेत. विशेषतः कपाशीच्या पिकावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघण्याचीही भीती
आर्णी गावातील शेतात लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे. या रोगामुळे कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान होत असून, हातातून पीक जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या गंभीर समस्येवर शासनाने तातडीने उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे



