
AI चा फोटो व्हिडिओ ट्रेंड फॉलो करताय तर वेळीच व्हा अलर्ट, सायबर तज्ञांचा इशारा…


सध्या सोशल मीडियावर गूगल गिमिनीचा नॅनो बनाना AI साडी ट्रेंड सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. युजर्स आपल्या साध्या फोटोंना 90s बॉलीवुड स्टाइल साडी लूक देत आहेत, शिफॉन साड्या आणि गोल्डन लाइटिंगसह स्लायलिश फोटो जनरेट करत आहेत…. हा ट्रेंड मजेदार जरी वाटत असला, तरी यामुळे आपली प्रायव्हसी धोकेही वाढले आहेत. त्यामुळे वेळीच सावध व्हा असे आवाहन धुळ्यातील सायबर तज्ञ ॲड चैतन्य भंडारी यांनी केले आहे…
गुगल जेमिनी नॅनो बनाना 3D स्टाईल ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, परंतु सायबर तज्ज्ञांनी वैयक्तिक फोटो अपलोड करण्याच्या जोखमीं बद्दल इशारा दिला आहे की चेहऱ्याच्या प्रतिमांचा गैरवापर होऊ शकतो, ज्यामुळे ओळख चोरी आणि फसवणुकीची शक्यता वाढते. त्यामुळे ह्या ट्रेंड पासून सावधान रहा व आपले वयक्तिक फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका असा सल्ला सायबर तज्ञ ॲड चैतन्य भंडारी यांनी यावेळी दिला….
प्रतिनिधी नागिंद मोरे



