
महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा अक्षरशः पाऊस, तब्बल सहाशे पाच हरकती दाखल…


प्रभाग क्रमांक चार मधील हिंदू नागरिकांचा पाच मध्ये समावेश करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने तयारीला वेग देण्यात आला आहे… या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्यानंतर या प्रभाग रचनेच्या संदर्भात हरकती मागविण्यात आल्या होत्या धुळे महापालिकेच्या प्रभाग रचनेनंतर या हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला असून तब्बल 605 हरकती दाखल झाले आहेत…
विशेष म्हणजे यातील सर्वाधिक हरकती या प्रभाग क्रमांक चार मधून असून महापालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये हिंदू मतदारांचा समावेश करण्यात आला असून याठिकाणी मुस्लिम मतदारांचा देखील समावेश असल्याने प्रभाग क्रमांक चार मधील हिंदू मतदारांचा समावेश पाच मध्ये करण्यात यावा अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी केली आहे.. दरम्यान हा समावेश न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या प्रभागातील नागरिकांनी दिला आहे…
प्रतिनिधी नागिंद मोरे



