
ऊसाच्या पिकात लपविलेला 16 लाखांचा गांजा शिरपूर तालुका पोलिसांनी केला जप्त….


शिरपूर तालुक्यातील आंबे शिवारातील रुपसिंगपाडा परिसरात शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करून तब्बल 229 किलो सुका गांजा जप्त केला. त्याची किंमत 16 लाख रुपय इतकी आहे. ऊसाच्या पिकात हा गांजा लपवलेला होता. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात केलेल्या या कारवाई प्रकरणी एका विरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने रुपसिंगपाडा येथील रूपसिंग दर्गा पावरा त्याचे घराच्या पाठीमागील शेतातमध्ये छापा टाकला. ऊसाचे पिकाचे लागवड केलेल्या क्षेत्रात तपासणी केल्यावर पत्र्याच्या कोठीत व चार निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये हिरवट रंगाचा उग्रवास असलेला 129 किलो गांजा, तर वेगवेगळ्या प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये प्रत्येकी 25 किलो वजनाचा एकूण 100 किलो गांजा आढळला. याची एकत्रित किंमत 16 लाख 5 हजार 940 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली….
प्रतिनिधी नागिंद मोरे



