
Dhule News भाजी विक्रेत्यांच्या बैठकीत भाजप ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा….


गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरात पाच कंदील भागात मनपा ने घेतलेल्या नो हॉकर्स झोनच्या निर्णयाविरोधात किरकोळ भाजी विक्रेते चांगलेच आक्रमक झाले आहे… प्रशासनाने गांधी पुतळा ते पाच कंदील परिसरात केलेला नो हॉकर्स झोन विरोधात भाजी विक्रेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे.. तर दुसरीकडे भाजपाचा एक गट या निर्णयाचे स्वागत करीत आहे आता यावरून चांगलेच रणकंदन पेटले आहे….
आज भाजी विक्रेते आणि सर्वपक्षीय बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालया नियोजन हॉल येथे आयोजित करण्यात आली होती… यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या आपली बाजू मांडत असताना भाजपचे माजी नगरसेवक हिरामण गवळी हे त्यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करत होते… यावरून शुभांगी पाटील यांनी त्यांना जाब विचारला असता भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे यावेळी चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी उपजिल्हाधिकारी, खासदार व पोलीस उपाधीक्षक यांच्या समोरच शुभांगी पाटील यांच्या पतीला धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे…. या प्रकारामुळे धुळ्यातील नो हॉकर्स झोन वरून अधिकच राजकारण तापताना पाहायला मिळत आहे….
प्रतिनिधी: नागिंद मोरे



