
Dhule News स्वच्छता पंधरवडा निमित्ताने धुळे मनपाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन….


धुळे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशभर सुरू असलेल्या ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत धुळे महानगरपालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून आज मनपाने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले.
शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
धुळे शहरात राबवण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, कलाक्षेत्रात आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. यात शहरातील विविध शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, अशी माहिती आरोग्य विभागाचे महेंद्र ठाकरे यांनी दिली.
या स्पर्धेतील विजेत्यांना महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. विजेत्यांना सन्मानचिन्ह, तसेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल, असे मनपाने कळवले आहे.
प्रतिनिधी नागिंद मोरे



