
पिंपळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध तंबाखूच्या ट्रकसह 67 लाखांचा मुद्देमाल जप्त!


गुजरातहून दहीवेलमार्गे सटाण्याकडे जाणारा अवैध तंबाखूजन्य माल वाहतूक करणारा ट्रक पिंपळनेर पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतला. या धडाकेबाज कारवाईत तब्बल 67 लाख 21 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. पहाटे सुमारे 3 वाजता एम.एच.18 बी.जी.3473 हा ट्रक अडवून तपासणी करण्यात आली. त्यात परच्युटनच्या बॉक्सच्या आड मोठ्या गोण्या व पिशव्यांमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेली सुगंधीत स्वीट सुपारी आणि सुगंधीत तंबाखू आढळून आली.
या कारवाईत एकूण – ₹67,21,200 किंमतीचा जप्त करण्यात आला
या प्रकरणात अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता व अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



