
Dhule Crime; अट्टल मोटारसायकल चोरांना जेरबंद; आरोपींकडून 10 मोटारसायकली हस्तगत


धुळे : धुळे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या मालिकेवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत तिघा आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ₹3,70,000/- किंमतीच्या 10 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, 25 सप्टेंबर रोजी शिंदखेडा पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार दोंडाईचा शहरातून मुकेश संजय पवार (वय 24, रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा) व एका विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी आपल्या फरार साथीदार अजय उर्फ आकाश विजय भिल (रा. निरगुडी, ता. शिंदखेडा) याच्यासह मिळून शिंदखेडा व परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरी केलेल्या 10 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत ₹3.70 लाख इतकी आहे. या कारवाईमुळे शिंदखेडा परिसरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांचा पथक – पोहेकॉ. संतोष हिरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, सचिन गोमसाळे, सुरेश भालेराव, पोकॉ. राहुल गिरी, कमलेश सुर्यवंशी, विनायक खैरनार व हर्षल चौधरी यांनी यशस्वीरित्या केली.



