
धुळे शहरातील नगावबारी परिसरातील जल कुंभाला गळती लाखो लिटर पाण्याची नासाडी


मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराचा नागरिकांना फटका..
धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नागावबारी भागातील एमबीआर जल कुंभाच्या व्हॉल्वला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून नगावबारी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे….
एकीकडे शहरात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला असून धुळे मनपाच्या या गलथान कारभाराचा फटका यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे…
या जलकुंबाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे मात्र दुरुस्ती वेळेवर करण्यात न आल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी वारंवार होत असल्याने मनपाच्या या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे…
प्रतिनिधी: नागिंद मोरे



