
Dhule News कॉपर वायर चोरणारी शिरुडची टोळी गजाआड — धुळे तालुका पोलिसांची दमदार कारवाई!


धुळे: कॉपर वायर चोरणारी धुळे तालुक्यातील शिरुड येथील टोळीला पकडण्यात धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या पथकाला यश आले आहे. सदर टोळीकडून पिकअप वाहन आणि कॉपर वायर असा 2 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केली आहे…
धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारातील हिलाल ताराचंद पाटील यांच्या शेतातील एलटी लाईनच्या पोलवरील 450 फुट कॉपर वायर चोरट्यांनी चोरुन नेली होती. याप्रकरणी सब स्टेशन बोरकुंड येथील महावितरणचे कर्मचारी संजय सिताराम वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धुळे तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाल्यानंतर स्थानिक नागरीकांशी साधलेला संवाद, त्यांची सतर्कता, लक्षात घेवून शिरुड परिसरात तपासणी सुरु करण्यात आली. यात दादाभाऊ ईश्वर महाले, अतिष किरण शिरसाठ, विक्की सुभाष कोळी, रामदास बालु कोळी आणि अनिकेत राजेंद्र कोळी या संशयितांना चौकशी कामी ताब्यात घेतले.
पोलिसांनी चौकशी दरम्यान पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी कॉपर वायर लंपास केल्याची कबुली पोलिसांना दिली. यावेळी त्यांच्याकडून एकूण 2 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली…
प्रतिनिधी: नागिंद मोरे



