
धुळे; मनपा आयुक्त टक्केवारी घेण्यात व्यस्त; नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे होत आहे दुर्लक्ष, ठाकरे सेनेचा गंभीर आरोप


शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य; सफाई मात्र शून्यच….
गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे मात्र धुळे महानगरपालिका या नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या कचऱ्या प्रश्न ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मनपा आयुक्त आणि अधिकारी टक्केवारी घेण्यात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे… धुळे शहरातील कचरा प्रश्नी अनेकवेळा तक्रार करून देखील आयुक्तांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे आज धुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे…
शहरातील जुने धुळे भागात असलेल्या सुभाष चौकातील नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, नाल्यामध्ये प्रचंड कचरा असून या नालेसफाई बाबत महानगरपालिकेची उदासीनता दिसून येत आहे.. या परिसरात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे… येत्या दोन दिवसात या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर नाल्यातील सर्वात कचरा काढून आयुक्तांच्या दालनात टाकून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आला आहे…
प्रतिनिधी नागिंद मोरे



