
Dhule News | धुळे जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर — महिलांना मोठा वाटा!


धुळे : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून महिलांना मोठा वाटा मिळाल्याचे दिसून आले आहे. एकूण चार प्रवर्गांपैकी मागासप्रवर्ग (OBC), अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील अनेक जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
🔸 मागासप्रवर्ग (OBC)
१५ जागांपैकी ८ जागा महिलांसाठी राखीव.
महिला आरक्षित गावे – आर्वी, कुसुंबा, बोरकुंड, दुसाने, चिमठाणे, सोनगीर, हेंद्रुन, शिरूर.
पुरुषांसाठी – लामकानी, बेटावद, मालपुर, नेर, शिंगावे, विरदेल, खलाणे.
⚪ सर्वसाधारण प्रवर्ग
१५ जागांपैकी ७ जागा महिलांसाठी राखीव.
महिला आरक्षित गावे – विखरण, भाटपुरा, आर्वी, कासारे, निमडाळे, नरडाणा.
पुरुषांसाठी – म्हसदी (प्र. नेर), फागणे, वनवाल, नगाव, मूकटी, निजामपूर, दातार्ती, कापडणे, बाळसाने.
⚫ अनुसूचित जाती (SC)
३ पैकी २ जागा महिलांसाठी राखीव.
महिला आरक्षित गावे – विखरण, मेथी.
पुरुषांसाठी – थाळनेर.
🟢 अनुसूचित जमाती (ST)
२३ पैकी १३ जागा महिलांसाठी राखीव.
महिला आरक्षित गावे – जैताणे, सुक्रापूर, तराडी, चौपाळे, मांजरी, देऊर, बोराडी, वाघाडी, बोडकी खडी, धामणे, सामोडे.
पुरुषांसाठी – शतबारी, भाडणे, हिसाळे, कोडीद, पिंपळगाव, उमर्द, रोहिणी, सांगवी, छडवेल, दहीवद, दहिवेल.
या सोडतीत महिलांना मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



