
धुळे : वडजाई–सौंदाणे रस्त्याची चाळण; ग्रामस्थांचे ‘विशेष आभार आंदोलन’ चर्चेत!


धुळे तालुक्यात असलेल्या वडजाई सौंदाणे ते बाबुळवाडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्याची चाळण झाल्याने नागरिक चांगले हैराण झाले आहे.
धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ते खासदारांपर्यंत सर्वांना या संदर्भात माहिती देऊन देखील रस्त्याचे काम सुरू झाले नाही. या रस्त्याची निविदा निघून एक वर्ष उलटला आहे तरीदेखील लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्षण दिल्यामुळे त्यांचे अनोख्या पद्धतीने विशेष आभार मानत गावकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले..
त्यामुळे ग्रामस्थांनी केलेल्या या विशेष आभार आंदोलनामुळे तरी लोकप्रतिनिधींना जाग येईल आणि या रस्त्याचे काम त्वरित सुरू होईल याकरिता हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी…
प्रतिनिधी: नागिंद मोरे



