धुळे; मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांवर दादा भुसे यांचा घणाघात!
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि शेतकरी मेळावा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
मंत्री भुसे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत विरोधकांना याच मतदार याद्यांमुळे यश मिळालं होतं, तेव्हा त्या याद्या चांगल्या होत्या. पण आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या की विरोधकांना पोटदुखी सुरू झाली आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “विधानसभेतील पराभवानंतर विरोधक मतदार याद्यांवर दोष टाकत आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील बहिणी, तरुण आणि शेतकऱ्यांनी त्यांना झटका दिला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पराभव निश्चित असल्याचं कळल्यामुळेच विरोधक खोटा प्रचार करत आहेत.”
प्रतिनिधी नागिंद मोरे धुळे


