पिंपळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! मद्याची तस्करी रोखत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपळनेर, धुळे
प्रतिनिधी : नागिंद मोरे
पिंपळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत वाहनातून होणारी मद्याची तस्करी रोखण्यात यश मिळवले असून, सुमारे ₹3 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून पांढऱ्या रंगाच्या संशयित वाहनाला ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता ₹1,92,000 किमतीची विदेशी दारू आढळून आली.
वाहनचालक विनायक सखाराम राऊत (रा. सिताडीपाडा, वार्सा, ता. साक्री) याची चौकशी केली असता, त्याने हा दारूसाठा राकेश जाधव (रा. पिंपळनेर) याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले. पोलिसांनी वाहनासह मद्यसाठा तर ताब्यात घेतलाच, तसेच एकूण मुद्देमाल ₹3,42,000 इतका असल्याचे सांगितले.
या प्रकरणी दोघांविरुद्ध पिंपळनेर पोलिसांत महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकाने केली.


