धुळे; शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतूक विभागाची अचानक तपासणी; 60 चालकांची अल्कोहोल टेस्ट
धुळे शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित राहावा यासाठी आज दिनांक 26/06/2025 रोजी दुपारी 12.30 ते 02.30 वाजेपर्यंत वाहतूक विभागातर्फे शाळा सुटण्याच्या वेळेत विशेष अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली.
ही मोहीम जे. आर. सिटी स्कूल, सेंट अँथनी स्कूल, कमलाबाई हायस्कूल, कनोसा स्कूल, श्रीजी स्कूल आणि नूतन पाडवी स्कूल परिसरात घेण्यात आली.
तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रायव्हेट ऑटो रिक्षा व व्हॅन चालकांची एकूण 60 जणांची ब्रेथ अॅनालायझरच्या सहाय्याने अल्कोहोल तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्व चालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
अधिकाऱ्यांनी चालकांना खालील बाबींचे पालन बंधनकारक असल्याचे निर्देश दिले—
- वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी (फिटनेस) करणे
- आवश्यक कागदपत्रांची वैधता टिकवून ठेवणे
- वाहनाची वेगमर्यादा पाळणे
- विद्यार्थ्यांचे सुरक्षित चढ–उतार सुनिश्चित करणे
- निर्धारित सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे
विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारी कोणतीही नियमभंगाची घटना आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.


