Dhule News धुळे शहरात बेकायदेशीर गॅस रिफिलींगवर मोठी कारवाई; सहा ठिकाणी एकाचवेळी छापे….
धुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या गॅस रिफिलींग करणाऱ्या गोरखधंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सहा ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यासाठी विशेष पथके तयार केली होती.
दि. 06/12/2025 रोजी घेतलेल्या या धडक कारवाईत एकूण 7 गॅस सिलेंडर, रिफिलींगसाठी वापरले जाणारे साहित्य मिळून अंदाजे 25,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई धुळे शहर, आझादनगर, देवपूर, चाळीसगाव रोड आणि मोहाडी नगर पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी करण्यात आली.
देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील चंदन नगर, मोचीवाडा परिसरात प्रभारी पथकाने धाड टाकली असता प्रदीप रुपचंद सूर्यवंशी (वय 48, रा. विष्णूनगर, मोचीवाडा) हा व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा व वाहनांमध्ये गॅस भरण्याचे साहित्यासह आढळून आला. त्याच्याविरुद्ध लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस रेग्युलेशन ऑर्डर 2000 कलम 1(3) उल्लंघन व जि.व.का.क. 3/7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई मा. SP श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि. श्रीकृष्ण पारधी, सपोनि. नामदेव सहारे, पोउनि. अमित माळी आणि अंमलदार संतोष हिरे, सदेसिंग चव्हाण, प्रकाश सोनार, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, शशिकांत देवरे, तुषार सूर्यवंशी, मायूस सोनवणे, चेतन बोरसे, सुशिल शेंडे, हर्षल चौधरी, जगदीश सूर्यवंशी, विनायक खैरनार व कैलास महाजन यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.
#dhulenews #dhulecrime #dhulekar #DhuleCity #news #trending #viralnews #dhulenews24 #dhule #DhulePolice


