Dhule Election Result; धुळे महापालिकेत भाजपची सत्ता अबाधित; ५० जागांसह प्रचंड बहुमत!
धुळे : धुळे महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपने तब्बल ५० जागा जिंकत एकहाती बहुमत मिळवले असून महापालिकेवर पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा डौलाने फडकवला आहे. या घवघवीत विजयाचे शिल्पकार म्हणून शहराचे आमदारच पुढे आले असून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही ऐतिहासिक मुसंडी मारल्याचे मानले जात आहे.
विरोधी पक्षांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ला केवळ ०८ जागा, तर शिवसेना (शिंदे गट) ला ०५ जागा मिळाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत एमआयएमनेही जोरदार भरारी घेत १० जागांवर विजय मिळवला, तर १ अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. मात्र, काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही, त्यामुळे पक्षाचा पार धुव्वा उडाला आहे.
भाजपने निवडणुकीपूर्वीच चार जागा बिनविरोध जिंकत आपले मनसुबे स्पष्ट केले होते आणि प्रत्यक्ष मतदानातही तीच विजयी घोडदौड कायम राखली. बहुतांश प्रभागांमध्ये भाजपने पूर्ण पॅनल जिंकले असून काही ठिकाणी एमआयएम आणि राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवली आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार (संक्षिप्त)
- प्रभाग १: उज्ज्वला रणजित भोसले (भाजप – बिनविरोध), योगीता कुटे, ललित माळी, सुभाष जगताप (सर्व भाजप)
- प्रभाग २: कविता सोनवणे, डॉ. निशा महाजन, प्रभावती शिंदे, सुनील सोनार (सर्व भाजप)
- प्रभाग ३: शोभा भिल, मिनल परदेशी, युवराज चौधरी, देवेंद्र सोनार (सर्व भाजप)
- प्रभाग ४: शहनाज खाटीक, तोहीम अनम, इरफान अन्सारी, प्रवीण बानो (सर्व राष्ट्रवादी)
- प्रभाग ५: नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी, संध्या कदम, कृपेश नांद्रे (सर्व भाजप)
- प्रभाग ६: भगवान गवळी, ज्योत्स्ना पाटील (बिनविरोध), वैभवी दुसाणे, कमलेश देवरे (सर्व भाजप)
- प्रभाग ७: वंदना भामरे, रंगनाथ ठाकरे, रुपाली पाटील, विजय देवरे (सर्व भाजप)
- प्रभाग ८: लताबाई अहिरे (शिवसेना), प्रियंका बोरसे, उज्ज्वला ठाकरे, निलेश नेमाणे (भाजप)
- प्रभाग ९: पुनम शिरसाठ, प्रदीप बैरागी, लताबाई सोनार, संजय जाधव (सर्व भाजप)
- प्रभाग १०: सुनील बैसाणे, प्रतिभा पाटील, किरण कुलेवार, ललित आरुजा (सर्व भाजप)
- प्रभाग ११: रोहित चांदोडे, मायादेवी परदेशी, कल्पना महाले, चेतन गवळी (सर्व भाजप)
- प्रभाग १२: प्रतिक कर्पे, जयश्री अहिरराव, शितल वाघ, विक्रम थोरात (सर्व भाजप)
- प्रभाग १३: शाहबाज शाह, फातेमा बी, शाह नजमा, शेख मतीन (सर्व राष्ट्रवादी)
- प्रभाग १४: मुक्तार मन्सुरी, हसिना बानो, शाहजहानबी मंत्री, मिर्झा शोएब (सर्व एमआयएम)
- प्रभाग १५: अब्दुल लतिफ अन्सारी, आमेराबानो अन्सारी, हालीमा बानो, युसूफ मुल्ला (सर्व एमआयएम)
- प्रभाग १६: धीरज परदेशी, कल्याणी अंपळकर, पुष्पा पवार (भाजप), दीपक खोपडे (शिवसेना)
- प्रभाग १७: अमोल मासुळे, सुरेखा उगले (दोन्ही भाजप – बिनविरोध), धीरज कलंत्री, गीता नवले (शिवसेना)
- प्रभाग १८: चित्रलेखा परदेशी (भाजप), मंगला सोनवणे (शिवसेना), सारिका अग्रवाल (भाजप)
- प्रभाग १९: मदिना पिंजारी (एमआयएम), रऊफ खान पठाण (अपक्ष), आमिर पठाण (एमआयएम)


