धुळ्यात भाजपचे आंदोलन: हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध, प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त
धुळे | प्रतिनिधी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणारे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात भाजपकडून तीव्र आंदोलन करण्यात आले.
धुळे शहरातील महाराणा प्रताप पुतळा परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला. या आंदोलनात धुळे शहराचे आमदार उपस्थित होते.
यावेळी आमदार अनुप अग्रवाल बोलताना म्हणाले की,
“कोट्यवधी हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषाशी होऊच शकत नाही. हे वक्तव्य संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे आहे. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो.”
भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


