धुळे; शिवजयंतीनिमित्त फागणे गावात भव्य शिव विचार निबंध स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
📰 फागणे | प्रतिनिधी
शिवजयंतीनिमित्त फागणे गावात शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘शिव विचार’ निबंध स्पर्धा तसेच शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सुदीप फाउंडेशन फागणे आणि उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशन फागणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सरस्वती कन्या विद्यालय येथे पार पडला.
तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची व कार्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. शिव व्याख्याते सदाशिव सूर्यवंशी यांनी शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला.
निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य व पोवाडे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.

🔹 उपस्थित मान्यवर
मधुकर देवराम पाटील, इंजि. रावसाहेब राजेश पाटील, कवी प्रभाकर शेळके, सरपंच नागराज पाटील, कैलास पाटील, विक्रम पाटील, सुर्यकांत पाटील, गोपीचंद सूर्यवंशी, शिवाजी अहिरे, रत्नाकर बेसने, जगदीश बडगुजर, अमित बडगुजर, अॅड. प्रवीण मोरे सर, रामेश्वर पाटील, नवनीत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र युवा फाउंडेशनचे भूषण पाटील, पंकज सूर्यवंशी, संदीप साळुंखे, उमेश सूर्यवंशी, नितीन चौधरी, जितेंद्र भटू पाटील, जितेंद्र सैंदाणे तसेच सुदीप फाउंडेशनचे डॉ. कुणाल पाटील, सागर पाटील (सूत्रसंचालक), मगन देवराम पाटील, निखिल पवार, रोहित पाटील यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

सी. एस. बाफना हायस्कूल व सरस्वती कन्या विद्यालयाच्या कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.



