भाजपच्या राज्याची यंदा प्रथमच धुळ्यातून काढण्यात आली भव्य मिरवणूक….
भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वीच यंदा प्रथमच भाजपचा राजा, आमचा लाडका गणपती बाप्पा विराजमान होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज दुपारच्या सुमारास शहरातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. उद्या गणरायाची स्थापना घराघरांमध्ये मंडळांमध्ये होत आहे. त्यामुळे आमचे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्या त्या भागातील गणेश मंडळाच्या ठिकाणी राहतील. म्हणूनच आज आम्ही भाजपचा राजाची मिरवणुक काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी यावेळी दिली… फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून भाजपाच्या राजाची मिरवणुक काढण्यात आली….
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी बोलताना सांगितले की, धुळे महानगरपालिकेत भाजपा पुन्हा बहुमताने निवडून येईल. भाजपाला फिफ्टी प्लस सीट गणरायाच्या कृपेने मिळणार आहे. असा विश्वास महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी व्यक्त केला. शहरातील आग्रारोडवरील श्रीराम मंदिर येथून भाजपच्या राजाची एक दिवस आधीच मिरवणुक काढण्यात आली आहे. या मिरवणुकीने गणराज भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते….