धुळ्यातील हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या खूनी गणपती च्या मिरवणुकीला सुरवात…
धुळ्यातील मानाचा खुनी गणपतीला 130 वर्षाची परंपरा…
1865 मध्ये खूनी गणपतीची स्थापना झाल्याचे मानले जाते. 1895 मध्ये म्हणजेच ब्रिटिश राजवट लागू झाली. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. “इंग्रजांच्या काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. आमच्या येथे खांबेटे गुरुजी नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते. टिळकांच्या प्रेरणेतून समाजाला जोडण्यासाठी खांबेटे गुरुजींनी धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला.”
धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खुनी गणपतीची स्थापना केली जाते. हा उत्सव आजही अविरतपणे सुरू आहे. गणेशोत्सवासाठी शहरातील सर्वसमाज बांधव एकत्र येतात. खुनी गणपतीच्या आगमनाची मिरवणूक टाळ मृदुंगच्या गजरात काढली जाते.
खूनी गणपतीच्या आगमन मिरवणुकीत “मिरच्या मारुतीच्या मंदिरासमोर पाच भजन केल्यानंतर खूनी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होते. ज्ञानोबा आणि तुकाराम यांचा जयघोष करत टाळ मृदुंगच्या गजरात मिरवणूक निघते. विशेष म्हणजे गणपतीचे आगमन होत असताना त्यावर कोणत्याही गुलालाची उधळण केली जात नाही. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते.