प्रवासी महिलेला प्रवासात फसवून सोने-चांदीची बांगडी चोरी करणारा आरोपी शिरपूर पोलिसांच्या ताब्यात…
शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलीसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड केले. या आरोपीने बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेला फसवून तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्या होत्या. चोरी गेलेल्या बांगड्यांची एकूण किंमत सुमारे 70 हजार रुपये एवढी होती. याप्रकरणी नितिनबाई सोनवणे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामध्ये प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्याची माहिती दिली होती.
शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. मिळालेल्या पुराव्यांवरून आरोपीस अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या 1 तोळा वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व अंदाजे 15 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या बांगड्या असा एकूण 70 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.