धुळ्यातील गणेशोत्सवात अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची एन्ट्री
धुळ्यातील ABS ग्रूपच्या गणेशोत्सवा निमित्त अभिनेत्री प्रिया बेर्डे धुळ्यात…
दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे ह्या आज गणेश उत्सव निमित्ताने ABS ग्रुपच्या गणेशोत्सवासाठी धुळ्यात दाखल झाल्या त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले… धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक येथून एबीएस ग्रुपच्या गणरायाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी एबीएस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते…
यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी बोलताना सांगितले की मुंबईतील गणेशोत्सव आणि धुळ्यातील गणेशोत्सव यामध्ये फार काही फरक नाही सर्वच ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त उत्साह कायम असतो. त्यामुळे यंदाच्या गणेश उत्सवा दरम्यान मी गणेश चरणी प्रार्थना करते की सर्वांना सुखी आयुष्याचे आशीर्वाद मिळू दे त्याच बरोबर पाऊस पाणी पडू दे, तसेच आम्हा सर्व कलाकारांवर देखील आशीर्वाद मिळू दे असे साकड प्रिया बेर्डे यांनी गणरायाला घातले…