धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी संपर्क प्रमुख महेश मिस्तरी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये करणार प्रवेश….
धुळे शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जुने आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे महेश मिस्तरी महानगर प्रमुख किरण जोंधळे, अमित पवार हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहे.
“अनेक वर्षे एकनिष्ठपणे पक्षाची सेवा करूनही, गरजेच्या वेळी पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला नाही,” अशी खंत महेश मिस्तरी यांनी व्यक्त केली. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन आणि विकासाची कास धरून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत होणाऱ्या पक्षप्रवेशासाठी ते शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. त्यांच्या या निर्णयामुळे धुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे….