गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविण्यास परवानगी द्या, डीजे चालकांची प्रशासनाकडे मागणी…
गणेशोत्सवाच्या काळात डीजे वाजविण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी धुळे जिल्हा साऊंड डीजे चालक- मालक संघटनेने धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी डीजे चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की, पोलीस प्रशासनाने आम्हाला विश्वासात न घेता गणेशोत्सवाच्या तोंडावर डीजेवर बंदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे डीजे व्यावसायिक आणि यावर अवलंबून असलेल्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
अगोदरच धुळ्यात रोजगाराच्या संधी नाहीत. त्यात डीजे व्यवसायाच्या माध्यमातून डीजे चालक आणि कामगारांचा कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र ऐन गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालून पोलीस प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला आहे.
गणेशोत्सवात डीजे वाजविण्याबाबत पोलीस प्रशासन लागू करत असलेले नियम अटींच्या अधीन राहून आम्ही कोणताही नियम भंग न करता डीजे वाजवू, त्यामुळे डीजे वाजविण्यास परवानगी मिळावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे….