धुळेकरांनो सावधान अक्कलपाडा धरणातून १८,२७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे तसेच पांझरा, मालनगाव व जामखेडी प्रकल्पांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे अक्कलपाडा धरणात येवा वाढला आहे.
त्या अनुषंगाने –
📌 दि. 05/09/2025 रोजी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून
➡️ सकाळी 16,125 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
➡️ सायं. 6:30 वाजता तो वाढवून 18,275 क्युसेक करण्यात येणार आहे.
➡️ येवा वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येईल.
⚠️ त्यामुळे पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प विभाग व उपविभागीय अधिकारी, अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग यांनी केले आहे.