साक्री-पिंपळनेर रस्त्यावर भीषण अपघात; १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
साक्री-पिंपळनेर रस्त्यावरील कान नदीच्या पुलावर आज सकाळी बस आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ वर्षीय लक्ष्मी दिनेश जयस्वाल हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात तिच्यासह तिची आई आणि इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
साक्रीहून पिंपळनेरकडे बस जात होती, तर दोन दुचाकी पिंपळनेरहून साक्रीकडे येत होत्या. कान नदीच्या पुलावर या तिन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.
अपघाताची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साक्री पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.