“कांद्याला दर नाही” – नगावच्या शेतकऱ्याने २५ क्विंटल कांदा सडल्याने उखीरड्यावर फेकला
धुळे जिल्ह्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांना कांद्याच्या भावाभावामुळे मोठा फटका बसला आहे. मागील वर्षी ३ हजार रुपये क्विंटल दराने विकला गेलेला कांदा यंदा केवळ ५०० रुपयांवर घसरला आहे. एवढा खर्च करूनही उत्पन्न न मिळाल्याने त्यांच्या चाळीत साठवलेला तब्बल २५ क्विंटल कांदा सडून गेला. अखेर निराश होऊन त्यांनी तो कांदा उखीरड्यावर फेकावा लागला.
ही व्यथा फक्त एका शेतकऱ्याची नसून संपूर्ण परिसरातील शेतकरी दरकपातीमुळे हवालदिल झाले आहेत. “सरकारकडून फक्त आश्वासने मिळतात, प्रत्यक्षात मदत मात्र नाही,” असे म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रतिनिधी – नागिंद मोरे